सोनाराकडे केलेले मंगळसूत्र काळे पडले चिपळुणात ८० हजारांचा अपहार केल्या प्रकरणी सोनाराला अटक
चिपळूण : लग्नात पत्नीला बनवलेले सोन्याचे मंगळसूत्र काही दिवसानी काळे पडले. ते पुन्हा बनवून देण्यासाठी सोनाराला परत दिले असून ते परत न दिल्याने ८० हजाराचा अपहार केल्याचा गुन्हा दाखल होता. याप्रकरणी सोनाराला बुधवारी सकाळी अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला दोन दिवसाची पोलीस कोठंडी सुनावली.
सचिन नारायण खेराडे (३५, रा. सोनगाव, ता. खेड) यांनी फिर्याद दिल्यानुसार त्यांनी आपल्या विवाहप्रसंगी आरोपी राजबिहारी निताई मन्ना (३५, सध्या रा: पटेल प्लाझा, भेंडी नाका, चिपळूण, मूळ पश्चिम बंगाल) या सुवर्णकाराकडून ८० हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र नवीन बनवून घेतले. लग्नानंतर हे मंगळसूत्र हळूहळू काळे पडू लागल्याचे पत्नीने निदर्शनास आणून दिले. त्यामुळे पुन्हा नवीन मंगळसूत्र बनविण्यासाठी आरोपी राजबिहारी याला देण्यात आले, परंतु त्याने ते अद्याप बनवून न दिल्याने ५ ऑगस्ट रोजी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी राजबिहारीला बुधवारी अटक केली व न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
www.konkantoday.com