रत्नागिरी -कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटात आयशर टेम्पो दरीत कोसळून अपघात
रत्नागिरी -कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटात आयशर टेम्पो दरीत कोसळून अपघात घडला. अपघात प्रकरणी टेम्पो चालकावर देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हवालदार संदेश जाधव यांनी फिर्याद दिली आहे. शंकर कल्याण गिलबिले असे आरोपीचे नाव आहे. शंकर गिलबिले हा आपल्या ताब्यातील आयशर टेम्पो क्रमांक एमएच १२, एस एक्स १८३६ घेवून कोल्हापूरहून रत्नागिरी दिशेने येत होता. गिलबिले याला वळणाचा अंदाज न आल्याने टेम्पोवरील नियंत्रण सुटून टेम्पो गणपती मंदिरनजिक खोल दरीत कोसळला. हा अपघात सायंकाळी ४ वा. सुमारास घडला.
www.konkantoday.com