दापोली तालुक्यातील वरवेली धरणात आढळला बेपत्ता वृद्धाचा मृतदेह
दापोली तालुक्यातील पंदेरी दाभोळ येथून घरातून बेपत्ता झालेल्या ६१ वर्षीय वृद्धाचा मृतदेह बुधवारी सायंकाळी ७.३० वाजता गुहागर तालुक्यातील वरवेली धरणामध्ये आढळून आला. या मृतदेहाची ओळख पटवून तो त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
दाभोळ पंदेरी येथील गणपत पांडुरंग घरवे असे या वृद्धाचे नाव आहे. ते १९ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी एक वाजल्यापासून त्यांच्या घरातून बेपत्ता झाले होते. त्याच दिवशी दुपारी ४ वाजता दाभोळ वर्णोशी येथील बौद्धवाडीच्या दरम्यान काही लोकांना ते दिसले होते. मात्र त्यानुसार शोध घेतला असता ते सापडून आले नाहीत.
www.konkantoday.com