गणपतीपुळे देवस्थानचा कारभार संशयास्पद, देवस्थान कारभाराच्या चौकशीचे आदेश
रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गणपतीपुळे देवस्थान येथे मनमानी कारभार केला जात असल्याचा आरोप अशोक काळोखे व बाबाराम माने यांच्याकडून करण्यात आला होता. यासंबंधी काळोखे व माने यांनी कोल्हापूर धर्मादाय सहआयुक्त यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. या प्रकरणी सुनावणी होवून गणपतीपुळे देवस्थानचा कारभार संशयास्पद वाटत असून कारभाराची निरीक्षकांमार्फत चौकशी करावी तसेच देवस्थानच्या नुकसानीबाबत कारवाई करावी, असे आदेश धर्मादाय सहआयुक्त कोल्हापूर यांनी दिले आहेत.
अशोक काळोखे यांनी धर्मादाय आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीनुसार, गणपतीपुळे देवस्थानचा कारभार घटनेप्रमाणे चालवणे आवश्यक असताना नियम डावलून कारभार केला जात आहे. यामुळे देवस्थानचे आर्थिक नुकसान होत आहे. तसेच यामुळे जनमानसातील प्रतिमेला धक्का बसत आहे. देवस्थानचे पदाधिकारी विवेक भिडे, विद्याधर शेंड्ये आणि हरी रानडे यांच्या पंच पदी बेकायदेशीरितीने केलेल्या नेमणुका रद्द केल्या आहेत. असे असतानाही ही रिक्त पदे भरण्याबाबत पोलिसांकडून मनमानी कारभार सुरू आहे, असा आरोप काळोखे यांनी केला होता.
www.konkantoday.com