कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांमध्ये तपासणी मोहिमेत सापडले 14 हजार फुकटे प्रवासी
कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या रेल्वेगाड्यांमधील फुकट्या प्रवाशांना वेळोवेळी तिकीट तपासणीत पकडले जात आहे. गेल्या ऑगस्ट ते ऑक्टोबर या तीन महिन्यात करण्यात आलेल्या तिकीट तपासणीत १४,१५० विनातिकीट (फुकटे) प्रवासी आढळून आले. त्यांच्याकडून ८६ लाख ६७ हजार ८२० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. .
त्यामुळे अशाप्रकारचा फुकट्या प्रवाशांना कात्रीत पकडण्यासाठी तिकीट तपासणी पुढील ३ महिन्यासाठी अधिक तीव्र करणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे ‘अभिमानाने प्रवास करा, सन्मानाने प्रवास करा … तिकीट खरेदी करा
आणि अभिमानाने प्रवास करा’ असे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाने केले आहे. यापुढे ही तिकीट तपासणीची मोहीम कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गावर सुरू रहाणार आहे.
www.konkantoday.com