ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या गोवळकोट येथील गोविंदगड ३५० मशालींनी उजाळणार
ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या गोवळकोट येथील गोविंदगडावर प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही श्री देव सोमेश्वर व श्री देव करंजेश्वरी देवस्थान गोवळकोट यांच्यावतीने २६ नोव्हेंबर रोजी त्रिपुरारी पौर्णिमेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ३५० मशाली पेटवून गोविंदगडावर हा भव्य मशाल महोत्सव रंगणार आहे.
या महोत्सवाचे यंदाचे नववे वर्ष आहे. या महोत्सवामध्ये संपूर्ण किल्ल्याभोवती ३५० मशाली पेटवण्यात येणार आहेत. तसेच श्री देवी करंजेश्वरीत मंदिरात भव्य दिव्यांची आरास सजवली जाणार आहे. यामध्ये २६ रोजी सायंकाळी ५ वा. श्री देव करंजेश्वरी मंदिरात विधीवत पूजन, ५.१५ वा. ऐतिहासिक शिवकालीन देखाव्यासह भव्य शोभायात्रेने गोविंदगडावर प्रस्थान, ६ वा. गोविंदगडावर शिवप्रतिमेचे विधीवत पूजन, ६.१५ वा. गडावर मशाली प्रज्वलीत करून फटाक्यांच्या भव्य आतषबाजी, रात्री ८ वा. श्री देवी करंजेश्वरी मंदिरात गोंधळ व सांगता आदी कार्यक्रम होणार आहे. यावेळी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
www.konkantoday.com