कोमसापचे मराठी साहित्य संमेलन मॉरिशसमध्ये रंगणार


कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे १७ वे मराठी साहित्य संमेलन मॉरिशस येथे आयोजित करण्यात आले आहे. २ व ३ डिसेंबरला होणार असलेल्या या संमेलनाला आंतरराष्ट्रीय हृदयंगम मराठी साहित्य संमेलन असे नाव देण्यात आले आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ संपादक, लेखक विजय कुवळेकर यांची निवड करण्यात आली आहे. संमेलनाचे उदघाटन महाराष्ट्राचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार असून मॉरिशस येथील निशी हिरू स्वागताध्यक्ष असणार असल्याची माहिती कोमसापचे केंद्रीय कार्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी दिली.
येथील हॉटेल अप्पर डेक येथे आयोजित पत्रकार परिषदेत ढवळ यांनी संमेलनाची रूपरेषा सांगितली. यावेळी कोमसापचे जिल्हाध्यक्ष मंगेश मसके, साहित्यिका उषा परब, सदस्य संदीप वालावलकर उपस्थित होते.
ढवळ म्हणाले की, मॉरिशस सरकारच्या कला व सांस्कृतिक वारसा मंत्रालयातर्फे कार्यरत मराठी स्पिकींग युनियन तसेच मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशन, मॉरिशस मराठी कल्चरल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन होणार आहे. संमेलनास कोमसापचे संस्थापक तथा ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधुमंगेश कर्णिक, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे, मॉरिशसचे सांस्कृतिक कार्यमंत्री अविनाश तीलकूक, परराष्ट्रमंत्री ऍलन गानू, शिक्षणमंत्री लिलादेवी दुकून लाचूमान, कोमसापच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर, नियामक मंडळ सदस्य आमदार संजय केळकर आदींसह महाराष्ट्र व मॉरिशस येथील साहित्यिक, कवी, लेखक, कलावंत, रंगकर्मी, माध्यमकर्मी, भाषा साहित्याचे अभ्यासक उपस्थित असणार आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button