दापोली शहरात आमदार योगेश कदम यांच्या दिवाळीच्या शुभेच्छा देणाऱ्या फलकांची तोडफोड करून नुकसान केल्याप्रकरणी तिघा संशयितांविरोधात दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

0
31

दापोली शहरात आमदार योगेश कदम यांच्या दिवाळीच्या शुभेच्छा देणाऱ्या फलकांची तोडफोड करून नुकसान केल्याप्रकरणी तिघा संशयितांविरोधात दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दापोली पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, ८ नोव्हेंबरला दापोली शहरातील स्वा. सावरकर चौक, आसऱ्याच्या पुलावर आमदार योगेश कदम यांचे दिवाळी शुभेच्छा देणारे फलक लावण्यात आले होते. ते १५ नोव्हेंबरला रात्री अज्ञाताने फाडले होते. पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता त्या रात्री संतोष बिडकर व त्यांच्यासोबत २ अनोळखी यांनी हे फलक ओढून त्याची तोडफोड करून नुकसान करत असल्याचे आढळून आले. त्यानंतर शिवसेना शहर शाखाप्रमुख प्रसाद रेळेकर यांनी दापोली पोलिस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल केली. त्यानंतर संशयित संतोष बिडकर व दोघा अज्ञातांविरोधात दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास राजेंद्र नलवडे करत आहेत.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here