गणपतीपुळे परिसरातील लॉजिंग हॉटेल्स हाऊसफुल्ल
रत्नागिरी तालुक्यातील जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ आणि प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथे स्वयंभू श्री गजाननाचे दर्शन घेण्यासाठी आणि पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी विविध ठिकाणच्या पर्यटकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे. तसेच अनेक पर्यटक गणपतीपुळे येथे मुक्कामासाठी थांबत असल्याने संपूर्ण गणपतीपुळे परिसरातील लॉजिंग हॉटेल्स हाऊसफुल्ल झाल्याचे चित्र दिसून येत आहे. तसेच याच पर्यटकांच्या वाढत्या गर्दीमुळे अनेक हॉटेलमधून खास जेवणासाठी मोठ्या रांगा लागत असल्याचे चित्रही दिसून येते. तसेच विविध सर्वच लहान मोठ्या दुकानांमध्ये पर्यटकांची वाढती रेलचेल दिसून येत आहे. एकूणच गणपतीपुळे दिवाळी हंगामात पर्यटकांच्या. गर्दीने गजबजून गेले आहे.
गेल्या ३ ते ४ दिवसांपासून गणपतीपुळे येथे पर्यटकांची दर्शनासाठी मोठी मांदियाळी दिसून येत असून दर्शनासाठी गणपती मंदिरात लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत,
www.konkantoday.com