चिपळूणच्या रिक्षाचालकानी ज्यादा भाडे आकारल्यास कारवाई होणार
चिपळूण शहरातील एका रिक्षा चालकाने ज्यादा भाडे आकारणी केल्याची माहिती अधिकार कार्यकर्ते विद्याधर साळुंखे यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे केली होती. या तक्रारीची आरटीओने गंभीर दखल घेतली असून गुरुवारी मोटार वाहन निरीक्षकांनी चिपळूणला भेट देत तपासणी केली. रिक्षा व्यावसायिकांशी चर्चा करताना ज्यादा भाडे आकारले, तर कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला. तसेच तक्रारीच्या अनुशंगाने संबंधित रिक्षा व्यावसायिकालाही नोटीस बजावण्यात आली आहे. आठवडाभरात आपले म्हणणे वाहनाच्या
मूळ प्रमाणपत्रासह सादर करण्याच्या सूचना त्याला करण्यात आल्या आहेत.
www.konkantoday.com