एसटीला ऐन दिवाळीत मोठा धनलाभ
राज्यातील प्रवाशांची लालपरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसटीला ऐन दिवाळीत मोठा धनलाभ झाला आहे. गेल्या १५ दिवसात एसटी महामंडळाने तब्बल ३३० कोटी रुपयांची कमाई केली आहे.हंगामी दरवाढ करूनही अनेक प्रवाशांनी एसटी बसलाच पसंती दिली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहेअजूनही या कमाईत मोठी वाढ होऊ शकते, असं महामंडळाकडून सांगण्यात आलं आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव आणि त्यानंतर एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी आंदोलनामुळे एसटीला मोठा आर्थिक फटका बसला होता. त्यामुळे महामंडळ आर्थिक संकटात सापडले होते.
त्यातच मराठा आंदोलनाचा फटकाही एसटीला बसला होता. अनेक जिल्ह्यांमध्ये एसटी बसेसची तोडफोड करून जाळपोळ करण्यात आली होती. त्यामुळे काही दिवस एसटी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे महामंडळाचे (MSRTC) कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न बुडाले होते. मात्र, दिवाळीत एसटीने मोठी कमाई केली आहे.
www.konkantoday.com