
पावसामुळे आंब्याच्या येणाऱ्या हंगामात बागायतदरांना दोन टप्प्यांत उत्पादन घेण्याचा बोनस मिळण्याची शक्यता
दिवाळीच्या पूर्वसत्रात झालेल्या पावसामुळे आंब्याच्या येणाऱ्या हंगामात बागायतदरांना दोन टप्प्यांत उत्पादन घेण्याचा बोनस मिळण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे. दिवाळीच्या आधी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या पावसाने आंब्याचा हंगाम डिसेंबर ते मार्च (2024) आणि मार्च ते मे (2024) अशा दोन्ही टप्प्यांत उत्पादन मिळण्याची शक्यता वाढली आहे.
गेले दोन दिवस रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने जोर धरला होता. हा पाऊस बागायतदरांच्या पथ्यावर पडण्याचा
अंदाज बागायतदार व्यक्त करीत आहेत. साधारणपणे आंब्याची बेगमी दिवाळी झाल्यानंतर गुलाबी थंडीच्या चाहुलीने सुरू होते. प्राथमिक बेगमी हाती घेण्याच्या तयारीत असताना दिवाळी आधीच रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. हलका गारठा पडत असताना पडलेल्या पावसाने कलमांना नवीन फुटवे धरण्याची प्रक्रिया बागांमध्ये सुरू झाली होती. त्यामुळे मोहोर प्रक्रियाही वेगाने होईल. यामुळे पहिल्या टप्प्यातील उत्पादन लवकर येण्याची शक्यता नाचणे येथील बागायतदार अनिरुध्द साळवी यांनी व्यक्त केली.
www.konkantoday.com