उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे दोनच नेते महाराष्ट्रात पुढे यशस्वी झालेले दिसतील-खासदार संजय राऊत
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीवर प्रतिक्रिया दिलीय. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात भविष्यात फक्त दोन नेते राहतील, असा मोठा दावा केला आहे.या महाराष्ट्रामध्ये भविष्यात दोनच नेते राहतील, जसे त्या काळामध्ये बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार दोनच नेत्यांचे राजकारण होतं. शरद पवार आज पुन्हा एकदा संकटातून उभे राहत आहेत, नेतृत्व करत आहेत. बाळासाहेब ठाकरे हयात नाहीत. पण त्यांच्या विचारांची मशाल घेऊन उद्धव ठाकरे पुढे निघाले आहेत. उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे दोनच नेते महाराष्ट्रात पुढे यशस्वी झालेले दिसतील”, असा दावा संजय राऊत यांनी केला.
www.konkantoday.com