खेडतालुक्यातील कुळवंडी-शिंदेवाडी येथील दगडू शिंदे या शेतकऱ्याच्या शेळ्यांच्या कळपावर बिबट्याचा हल्ला
खेडतालुक्यातील कुळवंडी-शिंदेवाडी येथील दगडू शिंदे या शेतकऱ्याच्या शेळ्यांच्या कळपावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात २ शेळ्या जखमी झाल्या. अचानक झालेल्या हल्ल्यानंतर शेतकऱ्याने आरडाओरडा बिबट्याला पळून लावले. मात्र, या बाबत वनखाते अनभिज्ञ असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
कुळवंडी–शिंदेवाडी येथील दगडू शिंदे यांनी त्यांच्या बकऱ्या चरण्यासाठी जंगलमय भागात. सोडल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. बिबट्याने शेळ्यांच्या कळपावर हल्ला केल्याचे निदर्शनास येताच शेतकऱ्याला धक्का बसला. त्याने आरडाओरडा केल्यानंतर बिबट्या जंगलात पसार झाला.
www.konkantoday.com