शेतकऱ्यांनी विद्यापीठाचे तंत्रज्ञान वापरून व्यावसायिक दृष्टिकोन ठेवावा- आमदार योगेश कदम


दापोली :-*
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत कृषी महाविद्यालय दापोलीच्या ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषी कन्यांनी मौजे लाडघर येथे कृषी प्रदर्शन व कृषी मेळावा आयोजित केला होता. या कार्यक्रमाप्रसंगी दापोली-खेड-मंडणगड मतदार संघाचे आमदार मा. श्री. योगेश कदम प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तर विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रमोद सावंत हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मौजे लाडघर या गावच्या सरपंच महोदया सौ. मानसी बोवणे या होत्या. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी दापोली केंद्राचे केंद्रप्रमुख डॉ. संतोष वरवडेकर, माजी जि.प. अर्थ व शिक्षण सभापती मा.श्री. प्रदीप सुर्वे, माजी जि. प. समाज कल्याण सभापती सौ. चारुता कमतेकर, नवनिर्वाचित संचालक, खरेदी विक्री संघ दापोली श्री. संजय महाडिक , करजगाव चे उपसरपंच श्री. प्रशांत जोशी, ग्रामपंचायत सदस्य, श्री. सुभाष बाळ, तालुका कृषी अधिकारी श्री. उमेश मोहिते, कृषी अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. सचिन पाठक, लाडघर गावचे गाव अध्यक्ष श्री दिनेश गोरीवले, तंटामुक्ती अध्यक्ष श्री संदेश मोरे, कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष शिगवण व डॉ. प्रवीण झगडे ,पोलीस पाटील प्रमोद पवार आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक मध्ये डॉ. प्रमोद सावंत यांनी कार्यक्रमाचा उद्देश सांगून विद्यापीठाच्या शास्रज्ञांकडून शेतीमधील येणाऱ्या समस्यांचे उत्तर समजाऊन घ्यावे असे शेतकऱ्यांना आवाहन केले. या कार्यक्रमा च्या प्रसंगी कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात विद्यापीठाने कोकणातील विविध पिकाच्या विकसित केलेल्या जातींचे नमुने, फळझाडांपासून तयार केलेले मूल्यवर्धित पदार्थ, विद्यापीठाने विकसित केलेली विविध यंत्रे व अवजारे, बांबू पासून तयार करण्यात आलेली विविध हस्तशिल्पे सेंद्रिय उत्पादने, जैविक खते व बुरशीनाशके तसेच विद्यापीठाने विकसित केलेले विविध विविध शिफारशींच्या तंत्रज्ञानाची माहिती तक्त्यांद्वारे सादर करण्यात आली होती. प्रदर्शनातील सदर माहिती कृषी कन्यानी आलेल्या सर्व शेतकरी बांधवांना व महिलांना समजावून सांगितली. तसेच या माहितीचा वापर आपल्या शेतीमध्ये करून शेतीतील उत्पन्न वाढवावे असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आमदार मा. योगेश कदम ह्यांनी शासनाच्या शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे तसेच व्यावसायिक पातळीवर शेती करण्याचे आवाहन केले. विद्यापीठ खरोखर शेतकऱ्यांना पर्यंत विविध पद्धतीने पोहोचते आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेत आहे त्याबद्दल विद्यापीठाचे कौतुक केले. ग्रामीण कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत दोन्ही गटातील मुलींनी केलेल्या कामाचे तसेच आयोजित करण्यात आलेल्या कृषी प्रदर्शन व मेळाव्याची स्तुती केली. या कार्यक्रमात लाडघर गावाच्या नवनिर्वाचित सरपंच महोदया सौ. मानसी बोवने आणि ग्रामपंचायत सदस्य श्री. सुभाष बाळ यांचा मा. आमदार श्री. योगेशदादा कदम यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. विद्यापीठ कार्यक्रमाचे अध्यक्ष लाडघर गावच्या सरपंच महोदया सौ. मानसी बोवणे यांनी विद्यापीठाने आमच्या गावामध्ये येऊन कृषी प्रदर्शन व शेतकरी मेळावा हा कार्यक्रम घेतल्यामुळे आमच्या शेतकऱ्यांना याचा चांगला फायदा होईल आणि शेतकऱ्यांचे प्रश्नावर योग्य ते उत्तर मिळून शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी दूर होऊ शकतात. तसेच आपण या ठिकाणी येऊन आमच्या शेतकऱ्यांसाठी शेतीमध्ये उत्पन्न वाढवण्यासाठी जे मार्गदर्शन केले त्याचा सर्व गावातील शेतकऱ्यांनी पुरेपूर फायदा घ्यावा असे शेतकऱ्यांना आवाहन केले आणि कृषी कन्यांनी अशा प्रकारचा कार्यक्रम घेतल्याने त्यांचे कौतुक केले. तसेच गावातील शेतकरी प्रतिनिधी श्री विजय गोरीवले यांनी गेले तीन महिने या गावात कृषी कन्यांनी शेती विषयक अनेक उपक्रम राबवून आमच्या शेतकऱ्यांना विविध तंत्रज्ञानाची माहिती दिली याबाबत त्यांचे अभिनंदन केले. या मेळाव्या प्रसंगी शेतकऱ्यांचे शेतीविषयक अनेक प्रश्नांना विद्यापीठातील शास्त्रज्ञाने समर्पक अशी उत्तरे दिली. त्यामध्ये डॉ. सचिन पाठक यांनी यांत्रिकी शेती बाबत मजुरांवरील होणारा खर्च कमी करण्याकरता विद्यापीठाने विकसित केलेल्या विविध यंत्रे व अवजारांचा वापर केल्यास शेतीमध्ये उत्पन्नात भर पडू शकते असे सांगितले. भात, नागली, आंबा, काजू, नारळ, सुपारी या पिकांवर येणाऱ्या अनेक किडी व रोगांचे नियंत्रण कसे करावे याबाबत डॉ. राजेश मुळे यांनी मार्गदर्शन केले. आंबा लागवडीची पंचसूत्री आणि नारळ व सुपारी या पिकाचे लागवडीबाबतचे तंत्रज्ञान याविषयी डॉ. योगेश परुळेकर यांनी मार्गदर्शन केले. दुग्ध व्यवसायामध्ये दुधाचे उत्पन्न वाढवण्याकरिता आपल्या सभोवताली असलेल्या गवतावर व भात पेंढयावर विशेष प्रक्रिया करून त्या गवताचा वापर खाद्य म्हणून केल्यास तसेच हिरवळीच्या गवताची लागवड करून वर्षभर हिरवा चारा उपलब्ध केल्यास दुधाचे उत्पन्न चांगले वाढू शकते असे डॉ. नरेंद्र प्रसादे यांनी सांगितले. अळंबी उत्पादन बद्दल सविस्तर माहिती डॉ. श्रीकांत रिटे यांनी दिली
सदर कृषी प्रदर्शन व कृषी मेळाव्याला एकूण 129 शेतकऱ्यांनी उपस्थिती दर्शविली. या प्रदर्शनाकरिता आजूबाजूच्या गावातील देखील काही शेतकरी उपस्थित होते.
सदर कार्यक्रम डॉ. प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता रावे कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रवीण झगडे, ग्रामपंचायत सदस्य सुभाष बाळ, कृषी सहाय्यक नरेश आईनकर, समीर उसरे, दृकश्राव्य चालक श्रीयश पवार, शिपाई चंद्रकांत साळवी आणि कृषी कन्या प्रतीक्षा धुमाळ, सदिच्छा वडराईकर, श्रुती पाटील, विद्या पवार, उत्कर्षा मोहिते, आसावरी शिंदे, तनिशा शर्मा, दिव्याश्री शिरोडकर, रिंकी आईनेकर, साक्षी पवार, सायली झगडे, दिव्या भुरकुड, साक्षी कदम, प्रगती जाधव, प्राची फटकरे, श्रुती गांगुरडे यांनी विशेष प्रयत्न केले. शिवकन्या व कृषी आश्लेषा गटाच्या या अतिशय नेटक्या आणि नियोजनबध्द कार्यक्रमाचे सर्वांनीच कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रवीण झगडे व आभार प्रदर्शन प्रतीक्षा धुमाळ यांनी केले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button