काश्मीर मध्ये श्रीनगरच्या दल सरोवरातील किमान पाच हाऊसबोट आगीत जळून खाक झाल्या आहेत. येथील आग विझवण्याचे काम सुरु असून सर्व पर्यटक सुरक्षित असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दल सरोवर हे श्रीनगरमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे.
KASHMIR READER च्या वृत्तानुसार, अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की घाट क्रमांक ९ जवळील एका हाऊसबोटमध्ये आग लागली आणि ही आग आजूबाजूच्या हाऊसबोट्समध्ये पसरली. यामुळे मोठे नुकसान झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, आगीमुळे किमान अर्धा डझन हाऊसबोट्सचे नुकसान झाले आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
www.konkantoday.com