सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली

0
32

सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली आहे. दिवाळीनिमित्त ही भेट घेत असल्याची माहिती आहे. मात्र, याच भेटीदरम्यान दोघांमध्ये बैठक होण्याची शक्यता आहे.रयत शिक्षण संस्थेबाबत बैठक होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच वळसे पाटील हे शरद पवारांना भेटायला गेले आहे. या भेटी दरम्यान दोघांमध्ये कोणत्या विषयांवर चर्चा होणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी अजित पवारांना पाठिंबा दिला. सध्या विद्यमान सरकारमध्ये ते सहकार मंत्री आहेत. शरद पवारांचे निकटवर्तीय म्हणून त्यांनी राजकारणात ओळख आहे. शरद पवारांचे खंदे शिलेदार अजित पवार गटात गेल्यानं चर्चांना उधाण आलं होतं. मात्र राष्ट्रवादीतील फुट पडल्यानंतर ही पहिलीच दिवाळी आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here