तब्बल 5 लाख 40 हजार रुपये घेउनही कामासाठी न येता बोट मालकाची फसवणूक, एका विरुद्ध गुन्हा दाखल
मच्छिमारी बोटीवर काम करण्यासाठी तब्बल 5 लाख 40 हजार रुपये घेउनही कामासाठी न येता बोट मालकाची फसवणूक केली.ही घटना 6 मार्च 2023 ते 8 नोव्हेंबर 2023 या कालावधीत घडली आहे.दिपक बाबू तांडेल असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.त्याच्या विरोधात बोट़ मालक नासिर अब्दुल गनी वाघू यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.त्यानुसार,6 मार्च ते 8 नोव्हेंबर 2023 या कालावधीत दिपक तांडेलने नासिर वाघू या बोट मालकाकडे 2023-24 या कालावधीसाठी मच्छिमारी बोटीवर काम करण्यासाठी आगावू स्वरुपात रोख 5 लाख 40 हजार रुपये घेतले होते.परंतू एवढी मोठी रक्कम रोख स्वरुपात घेउनही मच्छिमारी कामासाठी स्वतः व इतर कामगारांसह कामावर न आल्याने तसेच घेतलेली रक्कम परत न करता फसवणूक केली.याप्रकरणी वाघू यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर संशयिताविरोधात भादंवि कायदा कलम 420 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
www.konkantoday.com