उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक ग्रामपंचायतींवर विजय मिळविला -खासदार सुनील तटकरे
महाराष्ट्रात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालांनी खरी राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची? यावर शिक्कामोर्तब केले असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नेतृत्व महाराष्ट्रातील जनतेने स्वीकारल्याचे स्पष्ट झाल्याचे मत अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केले.खा. तटकरे म्हणाले, ” गेल्या सव्वा वर्षांपासून महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची यावर चर्चा सुरू आहे. निवडणूक आयोगापुढे हा प्रश्न आता विचारासाठी आला आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर निवडणूक आयोग जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य असेन.
परंतु संसदीय लोकशाहीत लोकांचा कौल हा महत्त्वाचा असतो. काही दिवसांपूर्वी राज्यातील २५०० वर ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका झाल्या यात देशातील सर्वांत मोठा पक्ष असलेल्या भाजपने प्रथम स्थान पटकावले आहे. त्या खालोखाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक ग्रामपंचायतींवर विजय मिळविला आहे यावरूनच अजित पवार यांचे नेतृत्व सर्वांनी स्वीकारले असल्याचे स्पष्ट झाले.”
www.konkantoday.com