लोक जागृती फाऊंडेशन रत्नागिरी आणि प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड यांच्या संयुक्त विद्यमाने चाफे मराठी शाळा नंबर एक येथे रक्तगट तपासणी शिबिर
जिल्हा परिषद आरोग्य विभागांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड अंतर्गत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा चाफे नंबर एक, जि. प. शाळा चाफे धनगरवाडी, आणि चाफे गावडेवाडी या शाळेतील सुमारे दिडशे मुलांचे रक्तगट तपासणी करण्यात आली. तसेच इयत्ता सहावी व सातवी या वर्गातील तीस मुलांची सीबीसी तपासणी करण्यात आली. ही तपासणी लोक जागृती फाऊंडेशन चे कार्याध्यक्ष तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड चे आरोग्य सहाय्यक डॉ. परशुराम निवेंडकर यांच्या पुढाकाराने वैद्यकीय अधिकारी डॉ मधुरा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री. जाधव सर तसेच लॅब टेक्निशियन श्रीम. शिवलकर मॅडम यांच्या मदतीने करण्यात आले. या वेळी डॉ. निवेंडकर यांनी मुलांना स्वच्छ्ता व आरोग्य या विषयी मार्गदर्शन केले आजार त्यांची लक्षणे व उपाय या बावत आरोग्य शिक्षण दिले या वेळी मुख्याध्यापक श्री. महेश जाधव, श्री. अशोक दाताळ, सहशिक्षिका श्रीम. कडवेकर मॅडम त्याचे सहशिक्षक व आशा सेविका लॅब टेक्निशियन मोहित इत्यादी उपस्थित होते.
www.konkantoday.com