नेरळ मार्गावर किरवली ब्रिज वरून इनोव्हा कार खाली पडून झालेल्या अपघात तीन जणांचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी आहे. ही घटना मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास घडली.ही कार पनवेल कर्जत रेल्वे मार्गावर कोसळली. त्याचवेळी येथून जात असलेल्या मालगाडीचा जोरदार धक्का कारला लागला.
रोडवर होत असलेल्या अपघातापेक्षा हा अपघात विचित्र होता. कार पडली व त्याचवेळी मालगाडी आल्यामुळे हा भीषण अपघात झाला. मालगाडीचा कारला मोठा धक्का बसल्यामुळे कारमधील तीन जण जागीच ठार झाले. या घटनेत जखमी झालेल्या दोघांवर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात कारचेही मोठे नुकसान झाले.
www.konkantoday.com
Home राष्ट्रीय बातम्या रेल्वे ब्रिजवरुन कार रेल्वे रुळावर कोसळली..समोरुन मालगाडी आली.. तीन जण जागीच ठार