ऑनलाईन ऍप्सच्या माध्यमातून चालविण्यात येणार्‍या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केल्याने एकच खळबळ

0
66

वार्सोवा पोलिसांनी ऑनलाईन ऍप्सच्या माध्यमातून चालविण्यात येणार्‍या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केल्याने एकच खळबळ माजली आहे. या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली असून याचा अधिक तपास सुरू आहे. तनिषा कनोजिया, रूद्र राऊत आणि नमन्ना खान असे अटक केलेल्या आरोपींचे नाव आहे. तनिषघ ही ऑनलाईन ऍपच्या माध्यमातून हे सेक्स रॅकेट चालवत होती तिने साथीदारांच्या मदतीने यासाठी प्ले ऍप स्टोअरवर एक ऍप जारी केले होते. हे ऍप डाऊनलोड केल्यावर त्याच्या वापरकर्त्यांना १ हजार रुपये ते ६२ हजार रुपयांचे कॉईन खरेदी करावे लागत. त्यानंतर या वापरकर्त्याला एक लिंक प्राप्त होत असे. या लिंकद्वारे ऑनलाईन लाईव्ह सेक्स व्हिडिओ दाखविले जात होते. दरदिवशी अर्ध्या तासाचे व्हिडिओ या ऍपद्वारे दाखविले जात होते. त्याची इंस्टाग्रामवर जाहिरात केली जात होती.

www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here