
साखरपा दूरक्षेत्र येथे पाळीव गुरांची वाहतूक करणारी पीकअप गाडी पकडली
साखरपा दूरक्षेत्र येथे पाळीव गुरांची वाहतूक करणारी पीकअप गाडी पकडण्यात आली. यावेळी बजरंग दल लांजा यांनी पोलीस खात्याला मदत केली.गाडी पालीवरून कोल्हापूरच्या दिशेने निघाली होती. यामध्ये सहा पाळीव जनावरे वेड्यावाकड्या पद्धतीने भरण्यात आली होती.या गाडीचा अल्ताफ नामक चालक होता.कत्तलीच्या हेतूने ही वाहतूक करण्यात येत होती. या घटनेची माहिती मिळताच देवरुख पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांनी साखरपा दूरक्षेत्र येथे उपस्थित झाले.त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा नोंद करण्यात आला, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान रत्नागिरी, गोसेवा संघ यांचा मार्फत गुराची व्यवस्था करण्यात आली.
यावेळी बजरंग दल, लांजा व हिंदूराष्ट्र सेना यांनी यावेळी आरोपीना कडक कारवाई यासाठी निवेदन दिले, याआधी संघटनेकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली होती,ज्यामुळे अवैध गुरांच्या वाहतुकीला चाप बसेल.घटनेचा तपास पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संदेश जाधव, कदम करीत आहेत.
www.konkantoday.com