घटनाबाह्य सरकारची घटका भरलीच आहे. हिशोबाची वेळ जवळ येत आहे-शिवसेना खासदार संजय राऊत
मराठा आरक्षणावर एकनाथ शिंदे सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील खासदार आणि आमदारांना निमंत्रित केले नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चाला उधाण आले आहे.राज्य सरकारने बोलावलेल्या बैठकीला केवळ महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना बोलावण्यात आले.
शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले, या सरकारचे करायचे काय? महाराष्ट्र पेटलाय तरी यांचे निर्ल्लज्ज राजकरण सुरूच आहे. मराठा आरक्षणावर सर्व पक्षीय बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलावली.त्या बैठकीचे निमंत्रण शिवसेनेला नाही.
शिवसेनेचे 16 आमदार व 6 खासदार आहेत. सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे. एक आमदार असलेल्यांना निमंत्रण.एकही आमदार नाही अशांना देखील बोलावले.पण शिवसेना यांच्या डोळ्यात खुपते, असे संजय राऊत म्हणाले.अंबादास दानवे यांना विरोधी पक्षनेते म्हणून बोलावले. पण आम्हाला मानपान नको.पण प्रश्न सोडवा. जरांगे पाटील यांचे प्राण वाचवा. घटनाबाह्य सरकारची घटका भरलीच आहे. हिशोबाची वेळ जवळ येत आहे, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.
www.konkantoday.com