मराठा आरक्षणाबाबत सर्वात मोठी बातमी! पहिल्या टप्प्यातील कुणबी प्रमाणपत्र वाटपास उद्यापासून सुरुवात; सूत्रांची माहिती
राज्यभरात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटलेला असताना शिंदे समितीच्या बैठकीत मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. पहिल्या टप्प्यातील कुणबी प्रमाणपत्र वाटपास उद्यापासून सुरुवात केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.समितीकडे उपलब्ध असलेल्या डेटानुसार सरकार तत्काळ प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात करणार आहे. सध्या समितीकडे उपलब्ध असलेल्या पुराव्यानुसार प्रक्रिया पार पडणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
www.konkantoday.com