भोके रेल्वे रूळावर आढळला तरूणाचा मृतदेह
कोकण रेल्वे मार्गावरील भोके येथील रेल्वे रूळावर गुरूवारी रात्रीच्या सुमारास तरूणाचा मृतदेह आढळला. दिलपि सोमय मंडी (३८, रा. हुगळी, पश्चिम बंगाल) असे या तरूणाचे नाव असल्याचे त्याच्याजवळील आधारकार्डनुसार सांगण्यात आले. या घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत करण्यात आली आहे.
२६ ऑक्टोबर रोजी रात्री ८.३० च्या सुमारास भोके येथील रेल्वे रूळावर छिन्नविछिन्न अवस्थेत तरूणाचा मृतदेह आढळला. या तरूणाजवळ असलेल्या आधारकार्डच्या आधारे या तरूणाची ओळख समजून आली. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रूग्णालय येथे दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. www.konkantoday.com