समूह शाळांसाठी राज्यातून एकही प्रस्ताव नाही.
कमी पटसंख्या असणाऱ्या शाळांचे समायोजन करून समूह शाळा विकसित करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने प्रस्ताव मागितले होते. हे प्रस्ताव पाठविण्यासाठी दिलेल्या मुदतीत राज्यातून एकही प्रस्ताव अद्याप शिक्षण विभागाकडे आलेला नाही.त्यामुळे प्राथमिक शिक्षण विभागातर्फे विभागीय कार्यालये आणि शिक्षणाधिकारी यांच्यात दररोज होणाऱ्या बैठकीत समूह शाळांच्या प्रस्तावाबाबत आढावा घेतला जात आहे.
राज्यातील शून्य ते वीस विद्यार्थी संख्येच्या असलेल्या सरकारी शाळांचे समायोजन करून, नंदूरबार जिल्ह्यातील तोरणमाळ आणि पुणे जिल्ह्यातील पानशेत याठिकाणी समूह शाळा उभारण्यात आल्या. या धर्तीवर राज्यात समूह शाळा निर्मितीचे प्रस्ताव शिक्षण विभागाने शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत मागविले होते. त्यासाठी शिक्षण विभागाने १५ ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिली होती. परंतु या मुदतीत एकही प्रस्ताव आला नाही. पुण्यासह राज्यातील अन्य शिक्षण उपसंचालक कार्यालयात कोणताही प्रस्ताव दाखल झाला नाही.
www.konkantoday.com