“दापोली पोलीस ठाणे” या नूतनीकरण करण्यात आलेल्या प्रशासकीय इमारतीचा “लोकार्पण सोहळा”.
मागील वर्षांच्या मे महिन्यामध्ये (14/05/2022 रोजी सकाळी 06.30 वा) सकाळच्या प्रहरी दापोली पोलीस ठाणे इमारतीमध्ये असलेल्या पोलीस निरीक्षक यांच्या दफ्तरी कक्षामधील इलेक्ट्रिक लाइट मिटर मधून शॉर्ट सर्किट होऊन आकस्मिक आग लागून दापोली पोलीस ठाण्याचे नुकसान झाले होते.
गेल्या वर्ष भरात रत्नागिरी पोलीस विभाग हा दापोली पोलीस ठाणे पूर्ण क्षमतेने पूर्ववत करण्यासाठी परिश्रमपूर्वक काम करत होते. नूतनीकरणाचे काम हे संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग यांचेकडून तातडीने हाती घेण्यात आले होते व सदरची दुरुस्ती ही सार्वजनिक बांधकाम विभाग यांचेकडील विशेष दुरुस्ती कार्यक्रम सन २०२२-२३ अंतर्गत २०५९ सा. बा. (अनिवासी इमारती) विशेष दुरुस्ती कार्यक्रम या लेखा शिर्षांतर्गत रु ३३,१४,०००/- इतका निधी उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे तसेच नुतनीकरणाचे काम हे युद्ध पातळीवर करण्यात येऊन ते कमी कालावधीत प्रशासकीय कामकाजा करीता पोलीस विभागास उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.
जिल्ह्यातील तसेच खास करून दापोली मधील नागरिकांना कळविण्यात आम्हाला आनंद होत आहे की, नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले आहे, आणि दापोली पोलीस ठाणे आता पूर्णपणे कार्यान्वित झाले आहे आणि पूर्वीपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे समाजाची सेवा करण्यासाठी सज्ज आहे.
“दापोली पोलीस ठाणे” या नूतनीकरण करण्यात आलेल्या प्रशासकीय इमारतीचा “लोकार्पण सोहळा” हा मा. ना. श्री. उदय सामंत, मंत्री (उद्योग) महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री रत्नागिरी व रायगड जिल्हा यांच्या सुभहस्ते व मा. श्री. सुनील तटकरे खासदार , रायगड- रत्नागिरी लोकसभा मतदार संघ, विधानसभा सदस्य मा. श्री. योगेश कदम, मा. श्री. प्रवीण पवार, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र, मा. जिल्हाधिकारी श्री. एम. देवेंदर सिंह, मा. पोलीस अधीक्षक, श्री. धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. जयश्री गायकवाड तसेच पोलीस अधिकारी/ अंमलदार यांच्या उपस्थितीत दिनांक 28 ऑक्टोबर 2023 रोजी 03.00 वा संपन्न होणार आहे.
तरी, आम्ही दापोलीतील नागरिकांना नूतनीकरण केलेल्या पोलीस ठाण्यास भेट देण्यासाठी तसेच आम्ही देत असलेल्या सेवांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी दिनांक 28 ऑक्टोबर 2023 रोजी 03.00 वा “लोकार्पण सोहळा” या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे