मनोज जरांगेंना अटक करा नाहीतर…’, मराठा आंदोलकांनी गाड्याची तोडफोड केल्यानंतर सदावर्तेंचा इशारा


वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. याप्रकरणी तीन जणांना भोईवाडा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड करणारे मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते असल्याचा आरोप आहे.यावेळी आरोपींनी जोरदार घोषणाबाजी केल्याचीही माहिती मिळत आहे. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यासंदर्भात गुणरत्न सदावर्तेंनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना सदावर्तेंनी मराठा आंदोलक आणि मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच, मनोज जरांगेंनी तातडीने अटक करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

पुढे सदावर्ते म्हणाले की, पोलिसांच्या समोर गाड्यांची तोडफोड केली. शांततामय आंदोलनाची हीच व्याख्या आहे का? असा प्रश्न त्यांनी मनोज जरांगे यांना केला आहे. तर मनोज जरांगे यांना अटक करण्याची मागणी देखील त्यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे. सरकारने एकट्या जरांगेचं ऐकू नये असंही सदावर्ते म्हणालेत.

सदावर्ते यांनी उपोषणाचा इशारा देखील दिला आहे. हे ठरवून केलेलं षडयंत्र आहे. माझी मुलगी घाबरून ८ दिवसांपासून शाळेत गेली नाहीये. माझ्या पत्नीला, मुलीला धमक्या दिल्या जात आहेत, असं देखील सदावर्ते म्हणालेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button