
रस्त्यांवरील खड्ड्यांची ऑनलाईन तक्रार करता येणार
यापुढे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील असलेले राज्य आणि प्रमुख मार्ग यांच्यावरील खड्ड्यांची ऑनलाईन तक्रार करता येणार आहे. तक्रार केल्यावर तीनचार दिवसात रस्त्यांच्या दुरूस्तीचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेवले आहे.
१ नोव्हेंबरपासून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये रस्ता दुरूस्तीचे तक्रार निवारण ऍप कार्यरत होणार आहे.
यापूर्वी केंद्र शासनाकडून पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेच्या अंतर्गत बांधण्यात आलेल्या रस्त्यांसाठी अशा प्रकारच्या तक्रारी स्वीकारल्या जात आहेत. मात्र राज्य पातळीवरील रस्त्यांविषयीच्या तक्रारींसाठी अशा प्रकारचे ऍप प्रथमच बनवण्यात आला आहे. पी.सी.आर.एस. बीएब्लूडी महाराष्ट्र असे या ऍपचे नाव आहे. तक्रार करण्यासाठी नागरिकांना हे ऍप डाऊनलोड करावे लागेल. या ऍपवर केवळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांविषयीच तक्रार करता येणार आहे. महानगरपालिका, जिल्हा परिषद किंवा राष्ट्रीय महामार्ग याविषयींची तक्रार हे ऍप स्वीकारणार नाही.
www.konkantoday.com