
मुंबई-गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे,केंद्र सरकारच्या विरोधात नव्याने याचिका दाखल
सुमारे बारा वर्षापासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण आणि रस्त्यावरील खड्ड्यांच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असताना चिपळूण येथील पूल दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबई ते गोवा महामार्गाच्या निकृष्ट कामाकडे लक्ष वेधत केंद्र सरकारच्या विरोधात नव्याने याचिका दाखल करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते ऍड. ओवेस पेचकर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने असमर्थता दर्शविली. आम्ही यावर सुनावणी घेवू शकत नाही. तुमही मुख्य न्यायमूर्तीच्या खंडपीठाकडे दाद मागा, असा सल्ला याचिकाकर्त्याला दिला.
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणास होणारा विलंब आणि मोठ्या प्रमाणावर पडलेल्या खड्ड्यांच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असताना या महामार्गावरील सोमवारी दुपारी बांधकाम सुरू असलेला पूल कोसळून दुर्घटना झाली. काही कामगार जखमी झाले.
www.konkantoday.com