रत्नागिरी जिल्ह्यातील पुरवठा विभागातील १३ गोदामांपैकी ६ गोदामांचे बांधकाम प्रस्ताव अद्याप मंजुरीच्या प्रतीक्षेत
रत्नागिरी जिल्ह्यातील पुरवठा विभागातील १३ गोदामांपैकी ६ गोदामांचे बांधकाम प्रस्ताव अद्याप मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत तर दोन गोदामांचे दुरूस्ती प्रस्ताव अद्याप महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या दप्तरी प्रलंबित आहेत. यासोबतच चिपळूण तालुक्यात शासनाच्या नियमाप्रमाणे वाढीव क्षमतेचे गोदाम बांदण्यासाठी शासकीय जागाच उपलब्ध नसल्याने त्याच गोदामाचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या रेशन धान्याचा साठा करणार्या गोदामांची स्थितीच सध्या चिंताजनक झाली असल्याचे चित्र आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात सध्या आनंद शिध्यामुळे जिल्हा पुरवठा विभाग सर्व सामान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय ठरत आहे. अशातच राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील प्रत्येक गोदामाची क्षमता ही नियतनाच्या तीनपट असणे गरजेचे आहे. या आदेशानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील पाचल येथील गोदाम आणि रत्नागिरी तालुक्यातील पाली, जयगड आणि रत्नागिरी या तिनही गोदामांची क्षमता ही तीनपट करण्यात आलेली आहे. मात्र जिल्ह्यातील अन्य गोदामांची स्थिती मात्र अत्यंत चिंताजनक आहे.
www.konkantoday.com