विषारी औषध प्राशन केलेल्या विवाहितेचा उपचारांदरम्यान मृत्यू
राजापूर तालुक्यातील शिळ येथील विषारी औषध प्राशन केलेल्या विवाहितेचा उपचारांदरम्यान जिल्हा शासकिय रुग्णालयात मंगळवारी मृत्यू झाला.साक्षी संकेत बाईत (32,रा.बाईतवाडी शिळ,राजापूर) असे उपचारांदरम्यान मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे.1 ऑक्टोबर रोजी ती तापाने आजारी असल्याने तिच्या नातेवाईकांनी तिला डॉक्टरकडे जाउन औषधोपचार करण्यास सांगितले होते.या कारणातून तिने रात्री 10.45 वा.राहत्या घरीच विषारी औषध प्राशन केले.काही वेळाने तिला अस्वस्थ वाटू लागल्याने तिच्या नातेवाईकांनी तिला प्रथम राजापूर ग्रामीण रुग्णालयात नेउन अधिक उपचारांसाठी मध्यरात्री 1 वा.रत्नागिरी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले.या ठिकणी तिच्यावर उपचार सुरु असताना मंगळवार 10 ऑक्टोबर रोजी दुपारी 3.15 वा.साक्षीचा मृत्यू झाला.
www.konkantoday.com