वीजपुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या उद्योजकांनी महावितरणचे लोटे येथील कार्यालयावर धडक देत अधिकऱ्यांना जाब विचारला
वीजपुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या उद्योजकांनी मंगळवारी लोटे परशुराम इंडस्ट्रीज असोसिएशनच्या माध्यमातून महावितरणचे लोटे येथील कार्यालयावर धडक देत अधिकऱ्यांना जाब विचारला
खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक परिसरातील सातत्याने वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठाबाबत ठोस पावलं जर उचलली गेली नाहीत, तर महावितरण विरोधात मोठे आंदोलन करण्यात येईल. प्रसंगी महावितरणचे लोटेतील सबस्टेशनला टाळे ठोकण्याचा इशारा उद्योजक संघटनेचे अध्यक्ष राज आंब्रे यांनी दिला.
यावेळी उद्योजक संघटनेचे सचिव कुंदन मोरे, सहसचिव सूर्यकांत वडके, खजिनदार मिलिंद बारटक्के, जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष प्रशांत पटवर्धन, संचालक शिरीष चौधरी, विश्वास जोशी, रवींद्र कदम, मंदार अडिवरेकर, राजकुमार जैन, राजेश तिवारी, उद्योजक मिलिंद बापट, राजेंद्र पवार, उद्योगांचे प्रतिनिधी दांडेकर, महेश, पाटील, पेडणेकर आदी उद्योजक बहुसंख्येने उपस्थित होते.
www konkantoday.com