सर्वच प्रलंबित अर्ज निकाली काढा– जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह
*रत्नागिरी, दि.3 :- आपले सरकार, सीएम पोर्टल आदिंसह सर्वच प्रलंबित अर्ज तात्काळ निकाली काढा, विभागप्रमुखांनी एकही अर्ज प्रलंबित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी आज दिले.
जिल्हास्तरीय लोकशाही दिनाच्या निमित्ताने सर्वच विभागप्रमुखांशी ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी (सर्वसाधारण) शुभांगी साठे, विशेष भू संपादन अधिकारी निशाताई कांबळे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी मारुती बोरकर, खेड प्रांतधिकारी राजश्री मोरे आदी उपस्थित होते. यावेळी अन्य प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी हे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
आजच्या लोकशाही दिनी दापोली येथील दोन व रत्नागिरीचे दोने असे चार अर्ज प्राप्त झाले होते. पुढील लोकशाही दिनापर्यंत या अर्जांवर कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
www.konkantoday.com