गेली अनेक वर्षे कबड्डी क्षेत्रात कार्यरत असून, आपल्या जिल्ह्यात एकदा तरी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा व्हावी, हे सर्व कबड्डीप्रेमींचे स्वप्न आहे. ही संधी महाराष्ट्राला मिळणार असल्याने रत्नागिरी जिल्ह्यात ही स्पर्धा घ्यावी, याविषयीच्या चर्चेसाठी पालकमंत्री उदय सामंत व उद्योजक किरण सामंत यांची आपण भेट घेतली.मी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबतच असून, पक्षाशी गद्दारी ही आमच्या रक्तात नाही, अशी स्पष्ट भूमिका जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी येथे मंगळवारी स्पष्ट केली.
गेल्या दोन दिवसापांसून पालकमंत्री उदय सामंत व उद्योजक किरण सामंत यांची जिल्हाप्रमुख कदम यांच्या भेटीविषयीशी चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. त्यानंतर जिल्हाप्रमुख सचिन कदम हेही शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा रंगू लागली. या पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली.
www.konkantoday.com