मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी तात्काळ राजीनामा द्यावा-खासदार संजय राऊत
नांदेडच्या शासकीय रुग्णालयात गेल्या 48 तासांत 31 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात तब्बल 16 नवजात बालकांचा समावेश आहे. असाच प्रकार छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयात मंगळवारी घडला असून 2 बालकांसह 16 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.यावरुन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.
यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, “थोडी जरी माणुसकी शिल्लक असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्यमंत्र्यांनी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे.
या गंभीर घटनेमुळे आरोग्यमंत्र्यांना त्यांच्या खात्यात अजिबात इंटरेस्ट नसल्याचं दिसून येतंय. वेगळ्याच कामात ते अडकलेले असतात. निष्पाप लोकांचे जीव जात आहेत आणि सरकारला यांचं गांभीर्य काहीच वाटत नाही’, असं संजय राऊत म्हणाले.
www.konkantoday.com