वर्षाला ५०० लोककलावंतांचे प्रस्ताव मंजूर करा

0
44

कोकण नमन कलामंच ; ३२ नमन कलाकारांचा सत्कार


रत्नागिरी- कलावंतांना कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा ४८ हजार इतके आहे. ती मर्यादा १ लाखापर्यंत केली जावी. जे मानधन अ, ब, क श्रेणीनुसार दिले जाते, त्यात वाढ करून किमान ५ ते १० हजार इतकी वाढ केली जावी. त्याचप्रमाणे दरवर्षी जिल्ह्यातून १०० लोककलावंतांचे प्रस्ताव मंजूर करण्याचे उद्दिष्ट आहे, ते ५०० पर्यंत केले जावे, अशा मागण्या कोकण नमन कलामंचचे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांनी केल्या आहेत.
येथील नमन लोककला कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना फार पूर्वीपासून येथील ग्रामीण भागातील कलावंतांनी जिवापाड जपली आहे. या लोककलेतील रत्नागिरी तालुक्यातील ३२ ज्येष्ठ कलावंतांना शासनाच्या कलावंत मानधन योजनेचा लाभ मिळवून देण्यात आला आहे. तालुक्यातील त्या सर्व कलावंतांचा सत्कार कोकण नमन कलामंच रत्नागिरीतर्फे करण्यात आला. पानवल-होरंबेवाडी येथील सभागृहात हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला कोकण नमन कलामंच रत्नागिरीचे संस्थापक श्रीधर खापरे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जे. पी. जाधव, जिल्हा अध्यक्ष प्रभाकर कांबळे, उपाध्यक्ष अरुण कळंबटे, सचिव विश्वनाथ गावडे, सहसचिव सुरेश होरंबे, खजिनदार सुरेश येजरे, जिल्हा सदस्य सचिन काष्टे (संगमेश्वर), विश्वास दसम, पानवल गावचे गावकर गणपत होरंबे, शंकर होरंबे, तसेच कोकण नमन कलामंचचे श्रीकांत बोंबले, वृध्द कलाकार मानधन जिल्हा समिती सदस्य हरिश्चंद्र बंडबे आदी उपस्थित होते.या वेळी अध्यक्ष कांबळे म्हणाले, नमन कलावंतांना शासनाच्या माध्यमातून भरीव मदत मिळावी, यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांचा मोलाचा वाटा आहे. कोविड काळात तर आर्थिक संकटात सापडलेल्या जिल्ह्यातील सर्व नमन मंडळ, त्यातील कलावंत यांना आर्थिक सहाय्य शासनाच्या माध्यमातून मिळवून दिले होते. त्यानंतर आता या जेष्ठ कलावंतांना मानधन मिळवून देण्यात महत्वाची भूमिका घेतली आहे. सूत्रसंचालन विश्वनाथ गावडे, प्रस्तावना उपाध्यक्ष अरुण कळंबटे, तर कलाकार मानधन योजनेचे महत्व बीडीओ जे. पी. जाधव यावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात विशेष सत्कारात नमन लोककलेला सातासमुद्रापार पोहचविणारे शहरातील राजिवडा येथील शेख अहमद महमंद हुश्ये, तसेच कलाकार रमाकांत तानाजी घाणेकर, गौरव बंडबे यांचा करण्यात आला.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here