दोडामार्ग येथे मागील पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळाधार वृष्टीमुळे महाराष्ट्र व गोवा आंतरराज्य तिलारी या मातीच्या धरणातील पाणीपातळीत झपाट्याने वाढ असून धरण ओव्हर फ्लो होण्याच्या मार्गावर आहे.तिलारी आंतरराज्य धरण प्रकल्पातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. धरणाची पाणी पातळी 111.55 मी. इतकी म्हणजेच 94.28 टक्के झाल्याने धरणातील अतिरिक्त पाणी 2 ऑक्टोबर रोजी खळग्यातील दगडी धरणाच्या सांडव्यावरून पुच्छ कालव्याद्वारे तिलारी नदीत सोडण्यात येणार आहे. त्यामुळे या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा तिलारी पाटबंधारे प्रकल्पच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे.
www.konkantoday.com
Home स्थानिक बातम्या तिलारी धरणातील पाणीपातळीत झपाट्याने वाढ असून धरण ओव्हर फ्लो होण्याच्या मार्गावर