कोतवडे – नेवरे मार्गावर दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन

0
130

रत्नागिरी तालुक्यात रविवारी कोतवडे – नेवरे मार्गावर दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन झाले. त्यामुळे वाहन चालक, परिसरातील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.
कोतवडे नेवरे मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना बागा आहेत. शिवाय परिसरात काही ठिकाणी रिसॉर्ट उभे राहिले आहे; परंतु काही भागात झाडी भरपूर आहे. बागायती लागवडीसाठी व रिसॉर्टसाठी जंगलतोड झाल्याने वन्य प्राण्याचा अधिवास संपुष्टात आल्याने दिवसाढवळ्या बिबट्या मुख्य रस्त्यावर फिरत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. काही किलोमीटर मानवी वस्ती असल्याने या मार्गावर रात्री- या भागातून येताना नागरिकांच्या भीतीचे वातावरण असायचे परंतु आता दिवसाही बिबट्याचे दर्शन होत असल्याने ग्रामस्थ, वाहनचालक भयभीत झाले आहेत. वन विभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here