मी आणि माझे कुटुंब एकनाथ शिंदे यांच्याबरोबर- उद्योग मंत्री उदय सामंत

0
76

दोन दिवसांपूर्वी मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवरील डीपीमुळं राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत असलेल्या किरण सामंत यांनी डीपीवर ठाकरे गटाचं ‘मशाल’ चिन्ह ठेवलं होतं.तसेच, कॅप्शनला ‘जो भी होगा देखा जागेया’ असं लिहिण्यात आलेलं. यामुळे राजकीय चर्चा रंगल्या होत्या. यावर मंत्री उदय सामंत यांनी भाष्य केलं आहे.
उदय सामंत म्हणाले, “मी आणि माझे कुटुंब एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आहे. याविषयाला पूर्ण विराम मिळालेला आहे. किरण सामंत स्वत: ही ठाकरे गटातील अनेक पदाधिकाऱ्यांचा प्रवेश करून घेत आहेत. घडलेल्या प्रकाराबद्दल किरण सामंत यांनीही खूलासा केला आहे. कुटुंब म्हणून राजकीय आणि सामाजिक निर्णय एकत्र बसून घेतो
“आम्ही एकनाथ शिंदे यांच्याबरोबर राहणार आहोत. चुकून डीपी बदलल्यानं किरण सामंत यांना आपल्याकडं घेऊ यात, असं काहींना वाटत असेल. पण, तसं कुणी करू नये,” असेही उदय सामंत यांनी म्हटलं.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here