नवनिर्माण हाय चा क्रिश नेशनल डिफेन्स अकादमीच्या लेखी परीक्षेत उत्तीर्ण.

0
43

रत्नागिरी:- राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA नेशनल डिफेन्स अकादमी) परीक्षा हि भारतीय सैन्य दल, भारतीय
नौदल आणि भारतीय हवाई दल या भारतीय सशत्र दलांसाठी उमेदवारांची भारती करण्यासाठी केंद्रीय
लोकसेवा आयोग (UPSC) द्वारे आयोजित एक स्पर्धात्मक परीक्षा आहे. हि परीक्षा वर्षातून दोनदा घेतली
जाते, विशेषतः एप्रिल आणि सप्टेंबर महिन्यात.
शैक्षणिक वर्ष २०२३ – २४ च्या सप्टेंबर महिन्यात घेतल्या गेलेल्या या परीक्षेत नवनिर्माण हाय च्या इयत्ता
१२ वी च्या वर्गात शिकत असलेला क्रिश हा विद्यार्थी उत्तीर्ण झाला आहे. या परीक्षेत देशभरातून ३ लाख ६०
हजार विध्यार्थी बसले होते त्यातून ७ हजार ७०० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सदर परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या
उमेदवारांना SSB मुलाखतीकरिता बोलावले जाते. उमेदवारांची अंतिम निवड लेखी परीक्षा आणि SSB
मुलाखतीच्या निकालावर एकत्रितपणे आधारित असते.
यशस्वी विध्यार्थ्याचे, नाविनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री. अभिजित हेगशेट्ये, संचालिका सौ. सीमा
हेगशेट्ये, मुख्याध्यापिका सौ. नजमा मुजावर आणि शिक्षक वर्ग यांनी अभिनंदन केले आहे आणि त्याला
पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या आहेत.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here