रिझर्व्ह बँकेने २ हजार रुपयांच्या नोटा आता ७ ऑक्टोबरपर्यंत बदलता येणार

0
60

तुम्ही आतापर्यंत २ हजार रुपयांच्या नोटा बदलू शकलेले नसाल तर रिझर्व्ह बँकेने तुम्हाला मोठा दिलासा दिला आहे. आरबीआयनं आता २००० रुपयांच्या नोटा बदलण्याची मुदत ७ ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे आता लोकांना नोटा बदलून घेण्यासाठी एका आठवड्याचा अतिरिक्त वेळ मिळाला आहे.
यापूर्वी रिझर्व्ह बँकेने ३० सप्टेंबरपर्यंत म्हणजेच आजपर्यंत २००० रुपयांची नोट जमा करण्यासाठी किंवा बदलून घेण्यासाठी वेळ दिला होता. रिझर्व्ह बँक ही मुदत वाढवू शकते, अशी अटकळ बांधली जात होती. विशेषत: अनिवासी भारतीयांना २००० रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी अतिरिक्त वेळ देण्याची मागणी करण्यात आली होती. रिझर्व्ह बँकेच्या ताज्या पावलामुळे अशा लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे, जे काही कारणास्तव बँकांमध्ये २००० रुपयांच्या नोटा जमा करू शकले नाहीत किंवा बदलू शकले नाहीत.

रिझर्व्ह बँकेने दिली ही माहिती

भारतीय रिझर्व्ह बँकेने ३० सप्टेंबर रोजी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, नोटा बदलून घेण्यासाठी एका आठवड्याचा अतिरिक्त वेळ देण्याचा निर्णय घेतला असून, ७ ऑक्टोबर २०२३ पर्यंत २००० रुपयांच्या नोटा जमा करण्याची किंवा बदलण्याची विद्यमान प्रणाली कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरबीआयने यंदा १९ मे रोजी एक परिपत्रक जारी करून ३० सप्टेंबरपर्यंत २००० रुपयांच्या नोटा बँकांमध्ये जमा करण्यास किंवा बदलण्यास सांगितले होते.
www.konkntoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here