चिपळूण तालुक्यातील वीर आणि नारदखेरकी येथेजप्त केलेला लाकूडसाठा पंधरा दिवस पडून
चिपळूण तालुक्यातील वीर आणि नारदखेरकी येथे काही दिवसांपासून विनापरवाना वृक्षतोड झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर वकविभागाने लाकूडसाठा जप्त केला मात्र कारवाईला पंधरा दिवसांचा कालावधी उलटून गेल्यानंतरही जप्त केलेला लाकूडसाठा जाग्यावरच पडून असून पुढील कारवाई झालेली नाही. वनविभागाचे संबंधित अधिकारी रजेवर असल्याने पुढील कारवाई थंडावली असल्याचे पुढे येत आहे.
चिपळूण तालुक्यात सातत्याने विनापरवाना वृक्षतोडीच्या घटना उघडकीस येत आहेत. मध्यंतरी दसपटीतील ओवळी येथे मोठ्या प्रमाणात विनापरवाना वृक्षतोड झाल्याची घटना घडली. त्यावर वनविभागाने दंडात्मक कारवाई केली. या कारवाईनंतरही दसपटीत विनापरवाना लाकूडतोड सुरूच आहे. पंधरा दिवसांपूर्वी तालुक्यातील वीर आणि नारदखेरकी येथे वृक्षतोड होत असल्याचा प्रकार पर्यावरणप्रेमीनी उघडकीस आणला. त्यांनी या तोडीची माहिती वनविभागास दिल्यानंतर संबंधित अधिकायांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. www.konkantoday.com