रत्नागिरीतील तरुणाला लग्न करण्याच्या आणाभाका घेवून विवाहसंस्था ऍपवर ओळख झालेल्या तरूणीने विवाह करण्यास इच्छूक असलेल्या तरूणाला ५० हजार ६६६ रूपयांना लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. आपली आई आजारी असल्याचे सांगून उपचारासाठी ही तरूणी आपल्याकडून पैसे घेत होती. मात्र त्यानंतर लग्न करण्याचे ती तरुणी टाळू लागली या तरुणांने तिच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण तरूणी कोणत्याही प्रकारे प्रतिसाद देत नसून त्यामुळे आपली फसवणूक झाली. अशी तक्रार या तरूणाने रत्नागिरी शहर पोलिसांत दाखल केली.
विराज दळवी (३६, रा. रत्नागिरी) असे फसवणूक झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी शहर पोलिसांनी तिघा संशयितांविरूद्ध गुन्हा दाखल केला. करूणा मोरे, सोनल योगी (रा. दोन्ही खेड-रत्नागिरी) व एका अज्ञात इसमाविरूद्ध पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला. www.konkantoday.com
Home Uncategorised विवाह करण्यास इच्छूक असलेल्या तरूणाला ५० हजार ६६६ रूपयांना फसविल्याच्या आरोपावरून महिलेसह...