अमेरिका देशातून रत्नागिरीमध्ये दाखल झालेल्या टेलर आणि जोएल ह्या परदेशी पर्यटकांनी दिली श्री रत्नागिरीच्या राजाला आवर्जून भेट
अमेरिका देशातून रत्नागिरीमध्ये दाखल झालेल्या टेलर आणि जोएल ह्या पर्यटकांना देखील श्री रत्नागिरीच्या राजाची महती समजताच त्या दोन युवकांनी आवर्जून श्री रत्नागिरीच्या राजाचे दर्शन घेत राजा चरणी आपली सेवा दिली. त्यावेळी श्री रत्नागिरीचा राजा मंडळाकडून खास परदेशी पाहुण्यांचा गणेश प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला. त्यावेळी श्री रत्नागिरीचा राजा मंडळाचे दीपक पवार, निमेश नायर, अमित बने, अभिजित गोडबोले, मंदार आंब्रे, रोहित सावंत, निरंजन सोनावणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
www.konkantoday.com