
दुचाकी घसरून तरूणाचा जागीच मृत्यू
मुंबई-गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यातील महाडनजिक सोमवारी रात्री दुचाकी घसरून झालेल्या अपघातात कल्पेश राजू भिसे (२२, रा. शेलटोली-महाड) याचा मृत्यू झाला. कल्पेश राजू भिसे हा एमएच ०६ सीएच २५५३ क्रमांकाच्या दुचाकीने पोलादपूर येथून महाडच्या दिशेने जात असताना पाले गावाच्या हद्दीतील पुलावरील रस्ता दुभाजकावर आदळला. त्याच्या तोंडाला व डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने रूग्णवाहिकेने पोलादपूर ग्रामीण रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सलगारे, डॉ. प्रणीत जगदाळे यांनी त्याला मृत घोषित केले. www.konkantoday.com