नवविवाहितांची रिक्षा रस्त्याच्याकडेला असलेल्या विहिरीमध्ये पडली,नवदांपत्यासह एका तरुणीचा मृत्यू

0
84

पुणे जिल्ह्यातील सासवड येथून रिक्षा अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे. या अपघातात, नवदांपत्यासह एका तरुणीचा मृत्यू झाला आहे. लग्नानंतर नवदाम्पत्य देवदर्शनाला जेजुरीला जात असताना हा अपघात घडला असून या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.सविस्तर माहिती अशी की, पुण्याच्या धायरीहून जेजुरी येथे देवदर्शनासाठी चाललेल्या नवदांपत्याला घेऊन जाणारी रिक्षा सासवडजवळ विहिरीत पडली. त्यात नवदांपत्यासह एका तरुणीचा मृत्यू झालाय. तर दोघांना वाचवण्यात पोलिसांना यश आलं आहे.

पुण्यातील धायरी येथून खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या नवविवाहितांची रिक्षा ही सासवड नजीक बोरावके मळा येथे रस्त्याच्याकडेला असलेल्या विहिरीमध्ये पडली. अपघात कसा याची माहिती मिळाली नाही. मात्र संसाराला सुरुवात होण्याअगोदरच या नवदांम्पत्याचा दुर्दैवी अंत झाला आहे. सोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनंतर रिक्षातील सर्वांशी कुटुंबाचा संपर्क तुटला होता. आज सकाळी व्यायामाला जाणाऱ्या मुलांना विहिरीतून वाचवा, वाचवा असं कोणीतरी ओरडल्याचा आवाज आला. त्यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता दोन व्यक्ती त्यांना त्या विहिरीत दिसल्या आणि यानंतर ही माहिती सासवड पोलिसांना देण्यात आली. सासवड पोलिसांनी दोघांना सुखरूप बाहेर काढलं आहे. मात्र नवविवाहित जोडपं आणि एका तरुणीचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here