मद्यपी चालकाला बाजूला करत एसटीच्या कंडक्टरनेच 60 किलोमीटर पर्यंत बस चालवल्याचा प्रकार
मद्यपी चालकाला बाजूला करत एसटीच्या कंडक्टरनेच 60 किलोमीटर पर्यंत बस चालवल्याचा प्रकार रायगडमध्ये समोर आला आहे. चालकाने मद्यपान केल्यामुळे कंडक्टरला बस चालवावी लागली आहे.
घटना शुक्रवारी संध्याकाळची असून श्रीवर्धन ते मुंबई प्रवासादरम्यान ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी चालका विरुद्ध रामवाडी येथील एस टी महामंडळाच्या विभागीय कार्यालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या सगळ्या प्रकारामुळे एसटी प्रवास (MSRTC) करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
आबाजी धडस असे मद्यपी चालकाचे नाव असल्याचे समोर आलं आहे. एसटी प्रशासनाने या मद्यपी चालकावर निलंबनाची कारवाई केली आहे. श्रीवर्धन ते मुंबई एस बस संध्याकाळी साडेचार वाजता श्रीवर्धन स्थानकातून निघाली होती. बस माणगाव एस टी स्टँड येथे थांबली असता चालकाने तेथेच मद्यपान केले. चालकाने मद्यपान केल्याचे कंडक्टरच्या लक्षात येताच त्याने श्रीवर्धन डेपोशी संपर्क साधला. त्यानंतर कंडक्टर हा कंडक्टर कम ड्रायव्हर असल्याने मद्यपी चालकाला बाजूला केला. त्यानंतर कंडक्टरने एस टी बस ताब्यात घेतली. पुढे सुमारे 60 किलो मीटर कंडक्टरनेच एसटी बस चालवत आणली. रामवाडी येथे बस असताना चालकाविरुध्द तक्रार दाखल करण्यात आली.
www.konkantoday.com