
विधानपरिषदेमधील देखील 3 आमदार अपात्र होतील-आमदार अनिल परब
विधान परिषदेचे तीन आमदार ज्यात उपसभापती नीलम गोऱ्हे, मनीषा कायंदे आणि विप्लव बाजोरिया यांच्या विरोधातील अपात्रतेबाबत याचिका आम्ही विधान परिषदेच्या सचिवांकडे 21 जुलै 2023 रोजी दाखल केली आहे. अशी कोणत्या प्रकारची याचिका आमच्याकडे आली नसल्याचं बोललं जात आहे. असे बोलण्याची सध्या पद्धत रुजू झाली आहे. प्रत्येक गोष्टीत आमच्याकडे कागद आले नाहीत असं सांगायचं. या तीन आमदारांवर कोणती कारवाई झाली नाही. याबाबत रिमांइडर आम्ही देत आहोत. याबाबत कारवाई झाली नाही तर जसं खालील सभागृहातील सदस्यांविरोधात आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो तसं आताही आम्हाला जावं लागेल. तसंच आमची तयारी पूर्ण झाली आहे. ज्या प्रकारे शिंदे गटाचे विधानसभेमधील आमदार अपात्र होणार आहेत, तसंच विधानपरिषदेमधील देखील 3 आमदार अपात्र होतील, असे आमदार अनिल परब म्हणाले.
www.konkantoday.com